QN Green Society मध्ये उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा


QN Green Society मध्ये उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा
तळोजा फेज-2 : QN Green Society येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या 5 वर्षांपासून QN Green Society मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाची परंपरा जपली जात आहे.
यंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोसायटी कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. सोसायटीचे चेअरमन मनोज गायकवाड, सेक्रेटरी विजय गाडवे आणि खजिनदार श्रीकांत कासुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले.
यावेळी खजिनदार श्रीकांत कासुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला सोसायटीतील तब्बल 200 नागरिकांची उपस्थिती लाभली. कमिटीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर व्यवस्था आणि नियोजन केले होते.
ध्वजारोहण करताना ची व्हिडिओ पुढीलप्रमाणे
ध्वजारोहणानंतर उपस्थित नागरिकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी विशेष अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना समोसा, जिलेबी आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लहान मुलांसह सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
तसेच Qn green society मधील महिलावर्ग यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवून स्वातंत्र्यदिन साजरा केला.
देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत QN Green Societyचा स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडला.
जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩




