Breaking
ई-पेपरगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

वाशिंद : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेलबंध…

0 0 2 8 3 3

दि.१३.वाशिंद :– मा.श्री डॉ.डी.एस.स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात अवैध हत्यार/शस्त्र बाळगणा-या विरुध्द प्रभावी व परिणामकारक कारवाईसाठी पोलीस पथक तयार करुन कारवाई करण्याचे आदेशीत केले. श्री संदीप गिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी अवैध हत्यार/शस्त्र बाळगणारे तसेच मालमत्ते सारखे गुन्हे करणा-यान विरुध्द कारवाईकामी अधिनस्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे पोलीस पथक तयार करुन मार्गदर्शन केले.

दिनांक १०.०१.२०२६ रोजी शहापुर-वाशिंद या भागात विशेष रात्रौगस्त करीत असतांना, वाशिंद-आंबाडी या रस्त्याने आंबाडीच्या दिशेने दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत टेम्पोसह येणार असल्याची माहिती प्राप्त झाली, सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संदिप गिते, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रा. यांना दिली असता, त्यांनी माहितीची शहाणीशा करुन कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले, त्याप्रमाणे वाशिंद-आंबाडी रस्त्यालगत मौजे सारमाळ-आग्रीपाडा जवळ सकाळी ०३:३० वा. चे सुमारास छापा टाकला असता, कारवाई दरम्यान एक टेम्पोसह ८ इसम त्यांचे जवळ दरोडा टाकण्यासाठी लागणारे धारदार सुरा, लोखंडी सळई, कटवणी, पाना, स्कुड्रायव्हर, पकड, मिर्ची पुड, नॉयलॉन दोरी, असे एकुण ६,४७०००/- रुपये किंमीचे साहित्यासह संघटीत गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने पुर्वतयारीत मिळुन आले, आरोपीत १. रमेश सिताराम प्रजापती, रा. शिळफाटा कल्याण, २. जावेत शहाआलम खान, राज्य उत्तरप्रदेश, ३. आसिफ सलाम खान, रा. नालासोपारा, ४. आरीफ कासीम शाह, रा. शिळफाटा, कल्याण, मुळ उत्तरप्रदेश, ५. अताउल्ला अजमतुल्ला चौधरी, रा. शिळफाटा कल्याण, मुळ रा. उत्तरप्रदेश, ६. बडुद्दीन इद्रिस चौधरी, रा. शिळफाटा, कल्याण, मुळ रा. उत्तरप्रदेश, ७. महेन्द्र हजारीलाल मोर्या, रा. शिळफाटा, कल्याण, ८. यार महंमद सोहराब चौधरी, रा. शिळफाटा, कल्याण, अशा विरुध्द वाशिंद पो. ठाणे गुन्हा रजि. नं. ०५/२०२६ भा.न्या.सं कलम ३१० (४), ३१०(५) सह भा. हत्या. अधि. कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, यापुर्वी देखील त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांचेकडुन अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई मा. श्री डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, तसेच मा. श्री अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संदीप गिते, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक, महेश कदम, उप-निरी/रोहन शेलार, उप-निरी/दिपेश किणी, सफौ/प्रकाश साईल, पोहवा /२५०७ संतोष सुर्वे, पोशि/बोडके नेमणुक स्था.गु.शा., तसेच वाशिंद पो. ठाण्याचे नेमणुकीतील पोशि/सुरेश धिंदळे, पोशि/शशिकांत दिघे, पोशि/भिल्ल, पोशि/नलावडे, यांनी उघडकीस आणला असुन गुन्हयाचा अधिक तपास वाशिंद पोलीस ठाणे करीत आहेत.

1/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे