Breaking
ई-पेपरठाणेब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

वर्तक नगर पोलिस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी

0 0 3 1 0 3

ठाणे :- आज दिनांक 23/06/2026 रोजी ज्येष्ठ महिला नामे सौ लक्ष्मी महादेवन अय्यर, वय 66 वर्ष, राह. 260/C, दोस्ती विजेता , दोस्ती विहार, वर्तकनगर, ठाणे पश्चिम या दोस्ती विहार येथून रिक्षाने प्रवास करत असताना त्यांची पर्स रिक्षात विसरले असले बाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले असता तसेच सदर पर्समध्ये 18,00,000/- रुपये किमतीचे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन श्री प्रवीण माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस स्टेशन यांनी तपास पथकाचे पोशि/8134 नागरे व पोशि/5384 कात्राबाद यांना तत्काळ सदर रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले असता वर्तक नगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून ज्या रिक्षामध्ये दागिने विसरले होते त्या रिक्षाचा शोध घेतला व रिक्षामध्ये गहाळ झालेले 18,00,000/- रुपये किमतीचे सोन्याचे 12 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तक्रारदार महिलेस पोलीस स्टेशन येथे आणून परत केले. तक्रारदार महिलेस मिळालेल्या त्वरित प्रतिसादामुळे त्यांनी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे मानले आभार.

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 1 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे