बाहुलीच्या आयुष्याची गोष्ट: एक स्त्रीची आत्मकथा

* समाजाच्या अपेक्षांमध्ये अडकलेली स्त्री.* स्वतःच्या भावना, स्वप्न आणि अस्तित्वासाठी झगडणारी स्त्री * गुलामी च्या चावीने चालविली जाणारी बाहुली म्हणजेच इतरांच्या निर्णयांवर चालणारे आयुष.* बदलत्या रूपातही स्वतःचा आत्मा जपणारी स्त्री, ही कथा स्वतंत्रेचा शोध आणि स्वतःची ओळख समाजाच्या चौकटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न या वर आधारित केली आहे.
कथेचा विषय :- बाहुलीच्या आयुष्याची गोष्ट : एक स्त्रीची आत्मकथा
माझे जगणे आहे खेळण्यातील बाहुलीचे खेळ
कधी हसणे कधी रडणे आजच्या या आंधळ्या जगात वाटते आपण खेळू बाहुलीचे खेळ
माझे जगणे आहे खेळण्यातील बाहुलीचे खेळ
नको गुलामी चावीची भीती आंधळ्या जगाची चावी फिरवता बदलत्या बाहुलीच्या आकाराची
माझे जगणे आहे खेळण्यातील बाहुलीचे खेळ
होती जशी काल मी आजही तशीच आहे बाहुलीच्या या आंधळ्या जगात आजही मी एकटीच आहे
माझे जगणे आहे खेळण्यातील बाहुलीचे खेळ
एक स्त्री ची आत्मकथा
एक स्त्री – समाजाच्या अपेशांमध्ये अडकलेली आहे, जिचं आयुष इतरांच्या निर्णयांवर चालत, जणू एक बाहुली ती लहानपणा पासून इतरांच्या हुकूमावर चालते लहानपणी आई वडिलांचे निर्णय, समाजाचे विचार, लग्न, करिअर, स्त्रीला स्वतःच मत विचारातच घेता येत नाही. ती हळूहळू जाणते की तीच आयुष्य बाहुली सारखं आहे हसणं, रडणं, चालणं सगळ इतरांच्या चावीवर ती स्वतःला शोधण्याचा पर्यंत करते तेव्हा काहीवेळा गप्प बसते.एक दिवस ती ठरवते चावी तिच्या हातात असावी ती स्वतःचे निर्णय घेते स्वतःच्या पायावर उभी राहते , समाजाच्या अपेक्षा मोडून ती स्वतःच आयुष्य घडवते.तीच जगणं बाहुलीच खेळ होत पण आता ती स्वतःच तयार करते खेळ .
* बाहुलीच्या आयुष्याची गोष्ट : एक स्त्रीची आत्मकथा *
माझं नाव रुपाली.माझं आयुष्य सुरवातीपासूनच इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकलेल होत लहान असताना खेळायला बाहुल्या मिळायच्या पण पण हळूहळू जाणवलं की आपण च बाहुली बनत चाललोय इतरांच्या हुकूमांवर त्यांच्या चावीवर हसणारी, रडणारी. आई वडिलांनी ठरवलेली शाळा समाजाने दिलेली वागणूक नात्यांची जबाबदारी सगळं मी निमूटपणे स्वीकारलं पण अंतमनातून एक आवाज येत होता की ही चावी आपल्या हातात का नाही ? एक दिवस कानी एक वाक्य पडले * तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांवर घडत इतरांच्या अपेक्षांनवर नाही , त्या दिवशी मी ठरवलं चावी आपल्या हातात असावी.त्या नंतर मी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं , आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली.अडचणी खुप आल्या पण प्रत्येक मार्गावर मी स्वतःला आठवत राहिले.आजही मी एकटी आहे पण आता ती एकटेपणाची भावना नाही. स्वतंत्रेची भावना आहे, मी बाहुली नाही,मी रुपाली आहे – स्वतःच्या चावीवर चालणारी.
माझे जगणे आहे खेळण्यातील बाहुलीचे खेळ,पण आता मी स्वतःच तयार करते खेळ




