

ठाणे : दिनांक ०८.११.२०२४ रोजी गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे सपोनि/अब्दुल मलीक यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, ०२ वर्षांकरीता हद्दपार केलेला इसम त्याच्या ताब्यातील अग्निशस्त्र विक्री करण्याकरीता शिळडायघर पोलीस ठाणेच्या हद्दीत १८:३० वा. येणार आहे अशा आशयाची बातमी मिळाल्याने सदर बाबत वपोनि/सचिन गायकवाड यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे सपोनि/अब्दुल मलिक, पोउपनिरी/दिपक घुगे, सपोउपनिरी/दिपक जाधव, पोहवा/४८१७ प्रांत निकुंभ, पोहवा/४०६७ नंदकुमार पाटील, चापोहवा/६३९४ बाळु मुकणे असे पथक तयार करून मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने शिळ फाटा, शिळ-डायघर या ठिकाणी सापळा कारवाई दरम्यान ठाणे, बृन्हमुंबई, मुंबई उपनगरे, रायगड व पालघर या जिल्हयांच्या महसुली हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीसाठी हद्दपार केलेला इसम नामे राहुल उर्फ काळया उर्फ मोहमद गुलजार पिर मोहमद खान, वय २३ वर्षे, रा. शिळ-डायघर, ठाणे हा मिळून आला तसेच त्याच्या अंगझडतीत ०२ देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ०१ जिवंत काडतुस मिळुन आले आहे.
सदर घटनेबाबत आरोपीविरुध्द शिळ-डायघर पोलीस ठाणे येथे गु.र.न. । १३९२/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७(१), १३५, १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/अब्दुल मलिक हे करीत आहेत तसेच अटक आरोपीविरूध्द यापुर्वी शरीरांविरुध्दचे चार गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. शिवराज पाटील, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध-१) श्री. शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सपोनि/अब्दुल मलीक, पोउपनिरी/दिपक घुगे, सपोउपनिरी/ दिपक जाधव, पोहवा/४८१७ प्रशांत निकुंभ, पोहवा/४०६७ नंदकुमार पाटील, चापोहवा/६३९४ बाळु मुकणे या पथकाने केली आहे.




