Breaking
ठाणेब्रेकिंग

मराठा बहुजनांसह अन्यायग्रस्त जातीजमातींची मोट बांधून लोकराज्य पक्ष लढवणार जास्तीतजास्त जागा…!!!

0 0 2 8 3 3

ठाणे : राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचा सर्वांगीन विकास साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे लोकराज्य पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे मराठा बहुजनांसह सर्वच अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांची सामाजिक मोट बांधून महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या ५० विधानसभा मतदारसंघातून आणि ज्या ज्या ठिकाणी अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींचे प्रचंड संख्याबळ असेल अश्या निवडक ४० ते ५० विधानसभा मतदारसंघातून लोकराज्य पार्टीतर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.हि विविध जाती, जमाती, धर्म, पंथ, परंपरांनी समृध्द असलेल्या व विविधतेने नटलेल्या राष्ट्रात लोकशाहीची संविधानिक मुलतत्वे जोपासून “सामाजिक ध्रुवीकरण व संघटन करणे” तसेच तळागाळातील अन्यायग्रस्त जातीजमातींमधे “राजकीय सजगता” आणि “समाजाभिमुख वैचारीक ध्येय धोरणे व संविधानिक विचारधारा निर्माण करणे” प्रमुख उद्देश आहे. तरच वर्षानुवर्षे खिचपत पडलेला तळागाळातील समाज मदृढ व बलशाली होऊन त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, औदयोगिक व आर्थिक” विकास माधला जावून राष्ट्रकांती होऊ शकेल असा पुरोगामी विचार लोकराज्य पार्टीचा आहे. म्हणून २०२४च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सर्व अन्यायग्रस्त अनुसूचित जातीजमातींना सोवत घेऊन, अनुसूचीत जाती जमातींसाठी राखीव असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघातून किमान ४० ते ५० आमदार निवडून विधानसभेवर पाठवण्याचे ध्येय लोकराज्य पार्टीने ठेवलेले आहे. त्यासाठी विविध मागासवर्गीय समाजांसोबत व सर्वच समविचारी सामाजिक पक्षांसोबत युतीच्या माध्यमातून मतांचे धुवीकरण करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. “सामाजिक विकासासोबतच भारतीय लोकशाही सुदृढ व बळकट होण्यासाठी संविधानाच्या ध्येय, धोरणे, उद्देश आणि प्रस्तावनेचे काटेकोरपणे पालन करीत समाजाभिमुख कार्य करणे” हा लोकराज्य पार्टीचा मुलमंत्र आहे. कारण आजमितीस अनेक राजकीय पक्षांची शकले उडालेली असून त्यांची शक्ती विभागली गेलेली आहे. याचा फायदा घेत सर्व समविचारी पक्षांनी सामोपचाराने मैत्रीपुर्ण युती करून विधानसभेच्या सर्व जागा सामंजस्याने वाटून एकमेकांना सांघिक सहकार्य करण्याचे ठरवलेले आहे. त्यासाठी सर्व अनुसूचित जातीजमातींसह इतर मागासवर्गीय बहूजनांचे पावल्य असलेल्या सर्वच विधानसभा मतदारसंघासाठी सामंजस्याने संघटीतपणे निर्णय घेऊन “एकमेव उमेदवार उभा करून तो भरघोस मतांनी निवडून आणणे” हा लोकराज्य पार्टीचा ध्यास आहे. अशी माहीती लोकराज्य पक्षाचे महासचिव अॅड् किशोर दिवेकर यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली.

“महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमाती, धनगर, मराठा, भिल्ल, मन्नेरवारलू, ठाकर, ठाकूर, हलबा, माना” ईत्यादी प्रमुख जातीजमाती सर्वच पक्षांच्या विरोधात आहेत. तसेच तळागाळातील अनेक लहान मोठ्या जातीजमातींना संविधानिक “हक्कं, अधिकार व लाभ मिळत नसल्यामुळे स्वातंत्र्यानंतर त्यांचा “शैक्षणिक आर्थीक आद्योगिक व सामाजिक” विकास झालेला नाही. म्हणून त्यांचाही भावनिक उद्रेक आंदोलनातून व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे “शेतकरी, कामगार, कष्टकरी, बेरोजगार” यांच्या ज्वलंत प्रश्नांसोबतच राज्याच्या “शैक्षणिक धोरणासह, कृषी, औदयोगिक पशुसंवर्धन, व मत्स्योद्योग” ईत्यादी धोरणांचाही बोजवारा उडाल्यामुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. महागाईने तर कळस गाठलेला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पुन्हा संविधानाच्या अधीन राहून विकासाचीच नेमकी परिभाषा करण्याची व शिकवण्याची वेळ जनतेवर आलेली आहे. परंतू महाराष्ट्रातील प्रस्थापीत पक्षांच्या कोणत्याही नेत्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ व आस्था नसल्यामुळे, तसेच त्यांना अत्यावश्यक लोकाभिमुख जीवनावश्यक कार्येसुध्दा करायची नसल्यामुळे सगळीकडे अराजकता माजल्याचे जाणवत आहे त्यामुळे सर्व सामान्य जनमाणसांच्या प्रक्षोभातूनच “लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवला जाणारा हा “लोकराज्य पक्ष” उदयाला आलेला आहे.” असे लोकराज्य पार्टीचे अध्यक्ष सखाराम विञ्हाडे यांनी या परिषदेत पत्रकारांसमोर स्पष्ट केले.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकराज्य पार्टीच्या या पहील्याच पत्रकार परिषदेसाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वाच्या उपस्थितीत लोकराज्य पार्टीच्या खालील संभाव्य उमेदवारांची पहीली यादी जाहीर करण्यात आली.

लोकराज्य पक्षाची विधानसभा २०२४ उमेदवारांची पहिली यादी :

 

१. श्री. नरेंद्र पाटील- १७२ अणुशक्ती नगर, मुंबई

२. श्री. निल शिवडीकर १८३ शिवडी, मुंबई

३. श्री. कमलेश पोखरे १७३ चेंबूर, मुंबई

४. सौ. संजीवनी वैती. १५५ मुलुंड, मुंबई,

५. श्री. बांबूकुमार कांबळे – १४७ कोपरी पंचपाखाडी

६. श्री. सुनील विश्वकर्मा १४६ ओवळा माजिवडा

७. श्री. जालिंदर सिनलकर १४८ ठाणे शहर

८. श्री. धीरज मोरे- ११८ सटाणा

९. श्री. हेमंत कोळी-१९० उरण

१०. ऍड विलास निकुम २ शहादा, नंदुरबार (ST)

११. श्री. सुभाष बाविस्कर १०५ कन्नड, संभाजी नगर (औरंगाबाद)

१२. श्री. रवींद्र जाधव १११ गंगापूर, संभाजी नगर (औरंगाबाद)

१३. श्री. भूपेंद्र गवते- १५० ऐरोली, नवी मुंबई

१४. सौ. ज्योती गायकवाड- पवार १७४ कुर्ता, मुंबई (sc)

१५. सौ. संगीत जामनेकर ३७ बडनेरा, अमरावती.

१६. श्री. विशाल बगाळे – ३९ तिवसा, अमरावती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे