

ठाणे.दिनांक.५ :- गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे च्या नेमणूकीतील पोशि/३०१४ मयुर लोखंडे यांना त्यांच्या बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, दि.०४/०१/२०२५ रोजी एक इसम चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी कळवा रेल्वे स्टेशन परिसरात येणार आहे अशा मिळालेल्या बातमीच्या आधारे वपोनिरी/सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे, श्रेणी पोलीस उप निरीक्षक रविंद्र पाटील, सहा. पोलीस उप निरीक्षक दिपक जाधव, सुनिल माने, पोहवा/४८१७ प्रशांत निकुंभ, पोशि/८२४३ सागर सुरळकर असे पथक तयार करून पथकास कळवा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे पोलीस पथकाने कळवा रेल्वे स्टेशन परिसरातुन सापळा लावुन बातमीतील इसम नामे आदील मसीउद्दीन खान यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंगझडती व पिशवीची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात सॅमसंग कंपनीचे विविध मॉडेल असलेले एकुण रू. ५,५०,०००/- किं.चे ११० मोबाईल फोन मिळून आले. त्याच्या कडे मिळून आलेल्या मोबाईल बाबत त्याच्या कडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने त्याच्या ताब्यात मिळून आलेले मोबाईल फोन कलिना, सांताक्रुझ, मुंबई येथील झेडेश इंटरप्रायझेस नावाच्या दुकानातुन दि.१८/१२/२०२४ रोजी पहाटेच्या वेळेस घरफोडी करून चोरी केले असल्याचे सांगीतले. त्याने दिलेल्या माहिती वरून चौकशी करता दि.१८/१२/२०२४ रोजी वाकोला पोलीस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा रजि.नं. ११०४/२०२४ भारतीय न्यास संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
नमुद कारवाई श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, डॉ. श्री. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, श्री. शेखर बागडे, सपोआ, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि/सचिन गायकवाड, पोउपनिरी/दिपक घुगे, श्रेपोउपनिरी/रविंद्र पाटील, सपोउपनिरी/दिपक जाधव, सुनिल माने, पोहवा/४८१७ प्रशांत निकुंभ, पोशि/३०१४ मयुर लोखंडे, पोशि/८२४३ सागर सुरळकर, सर्व नेम गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे, यांच्या पथकाने केली आहे.




