Breaking
ठाणेब्रेकिंग

ठाणे : भिवंडी महानगरपालिकेचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!

0 0 2 8 3 3

भिवंडी : 16 डिसेंबर 2001 रोजी भिवंडी महानगरपालिकेची स्थापना झाली असून 23 वर्षे पूर्ण झाल्याने महानगरपालिकेचा 23 वा वर्धापन दिन आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रम प्रसंगी महानगरपालिकेतील जे अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत चांगले प्रकारे आपली कर्तव्य व जबाबदारी पार पाडली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना आयुक्त व मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त समाज कल्याण प्रणाली घोंगे, उपायुक्त शिक्षण अनुराधा बाबर, उपअभियंता बांधकाम सचिन नाईक,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बुशरा सय्यद,अंतर्गत लेखापरीक्षक नंदू चौधरी,विधी अधिकारी अनिल प्रधान,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मिलिंद पळसुले, सहाय्यक आयुक्त सामान्य प्रशासन अजित महाडिक, सहाय्यक आयुक्त आरोग्य फैसल तातली ,मुख्य उद्यान अधीक्षक निलेश संखे, भविष्य निर्वाह निधी विभाग प्रमुख श्रीकांत परदेशी व आरोग्य अधिकारी जयवंत सोनवणे यांसह ५० अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना विशेष मार्गदर्शन करीत “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री अभिनय प्रयोगाच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना देशसेवा,समाजसेवा आणि दैनंदिन प्रशासकीय काम उत्कृष्ठ करण्याविषयी प्रोत्साहनात्मक, प्रबोधनात्मक सादरीकरण केले.

या कार्यक्रमा प्रसंगी उपायुक्त मुख्यालय रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त प्रणाली घोंगे, उपायुक्त डॉ अनुराधा बाबर, उपायुक्त शैलेश दोंदे, सहाय्यक संचालक नगर रचना अजय साबळे, मुख्या लेखापरीक्षक मयूर हिंगाणे,शहर अभियंता जमिल पटेल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा संदीप पटनावर, मुख्य लेखा वित्त अधिकारी रामप्रसाद सोळुंके हे अधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे