ठाणे : खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून १ सराईत गुन्हेगारास दोन गावठी पिस्टल, ०१ जिवंत काडतूसासह जेरबंद.


ठाणे, दि.२८(उप संपादक – रितिक निकाळे) :- खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहरचे नेमणुकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक / सुनिल तारमळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ” इसम सचिन शिंदे रा. रोशन किराणा स्टोरचे बाजुला बंदरपाडा, कल्याण पश्चिम याचे ताब्यात दोन अग्नीशस्त्र व काडतुस आहेत.” सदर मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने दिनांक २५/०६/२०२५ रोजी १६:४५ वा अधिकारी अंमलदार यांचेसह रोशन किराणा स्टोअर्स च्या बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण पश्चिम याठिकाणी सापळा कारवाई करून दुखापत व अंमली पदाथीचे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे, वय ३० वर्षे, व्यवसाय फळविक्री, रा. स्वतःचे घर, रोशन किराणा स्टोअर्सचे बाजुला, मोहने रोड, बंदरपाडा, कल्याण पश्चिम हा कोणतातरी दखलपात्र स्वरूपाचा गंभिर गुन्हा करण्याचे इरादयाने बेकायदेशिर रित्या विनापरवाना दोन गावठी बनावटीचे पीस्टल, १ जिवंत काडतुस असा एकूण १,००,५००/- रूपये किमतीचे अग्नीशस्त्रासह मिळून आला. त्यास ताब्यात घेण्यात आले असुन सदर आरोपीचे विरूद्ध खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५४७/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३, २५ सह महा.पो.का. कलम ३७(१)१३५ अन्वये दिनांक २५/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपीत यांची दिनांक ३०/०६/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/सुनिल तारमळे हे करीत आहे. अटक आरोपीत यांचे विरूध्द यापुर्वी १) खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६/२०२३ भादवि कलम ३२६, ५०४, ३४ २) खडकपाडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४४/२०२५ एनडीपीएस कायदा कलम ८ (क) २०(ब) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध १, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध – २, गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि /कृष्णा गोरे, सपोपि/भुषण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/४०४४ ठाकुर, पोहवा/१०१५ पाटील, पोहवा/१५१० गायकवाड, पोहवा / २७० जाधव, पोहवा/१४१६ गडगे, पोहवा/४१८४ राठोड, पोहवा /१८ कानडे, मपोहवा/४४६६ पावसकर, पोना/१९२५ हासे, पोना/७०७९ मधाळे, चापोना/७३१२ हिवरे, पोशि/३२१३ वायकर, पोशि/८२४६ ढाकणे, पोशि/२६४० पाटील, पोशि/१९८४ शेजवळ, मपोशि/८१०१ भोसले यानी केली आहे.




