ठाणे : ठाणे कमिशनर ऑफिसच्यामागे बोगस डॉक्टर बेनी जॅकोब अभ्रम याचा सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ; याला कोणाचा पाठिंबा ? पोलिस प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष..!


ठाणे.दि.२८ (उप संपादक : रितिक निकाळे) :- माझे नाव रितिक मनोज निकाळे, वय : २६ ,पत्ता- जनता विकास नगर मुलुंड चेक नाका ए. सी. सी रोड मुलुंड पश्चिम, मी काल दिनांक २७/०५/२०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ७.३० वाजता कामानिमित्त कमिशनर ऑफिस ठाणे येथे गेलो असता माझी अचानक तब्येत खराब झाली, तिथे काहींना आजुबाजूला कोणी डॉक्टर असल्याचे विचारले असता त्यांनी डॉक्टर बेनी जॅकोब अभ्रम. राहनारा येऊर गाव, क्लिनिक पत्ता – ठाणे कमिशनर ऑफिसच्यामागे, दत्त मंदिर जवळ, चेंदनी बंदर रोड, क्रांतीनगर सेवा भावी संस्था यांच्याकडे जाण्यास सांगितले मी तिथे गेल्या नंतर डॉक्टरांना भेटलो आणि डॉक्टरांनी मला तपासले त्यांनंतर त्यांनी मला इंजेक्शन दिले आणि औषध दिले..

पण तिथल्या काही गोष्टींमुळे आणि डॉक्टर च्या वागण्यातून मला डॉक्टर वर संशय आला.. त्या डॉक्टर ने डॉक्टर असल्याचा बनाव रचल्याचा संशय आला.. त्याची चौकशी व्हावी म्हणून मी ठाणे महानगरपालिका येथील वैद्यकीय अधिकारी यांना फोन केला असता त्या तिथे हजर नसल्यामुळे मी स्वतः दोन पत्रकारांसोबत त्या हद्दीतील ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये गेलो..

तिथे गेल्या नंतर आम्ही सर्व हकीकत सांगून तक्रार घेण्यासाठी सांगितले तेथील पोलीस अधिकारी यांनी आपल्या सहकार्यांना आधी गुन्हा नोंद करून घेण्यास सांगितले नंतर माझ्यासोबत जी घटना घडली त्याबद्दल स्टेटमेंट मागत द्यायला सांगितली, आरोपी डॉक्टर स्वतः कबूल करत असताना माझ्याकडे कोणतेही डॉक्टरचे सर्टिफिकेट नाही तरी सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.. आशिष मेस्त्री याचा या खोट्या डॉक्टरला पाठींबा असल्याचे समजले आहे.. त्याचे फोन त्याला सतत येत होते. सामान्य नागरिक आपल्या आरोग्याचे आणि आपल्या रोगाचे इलाज करण्यासाठी डॉक्टरकडे जातात आणि ठाण्यात अशे बोगस डॉक्टर जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत. तरीही या घटनेचा तपास करून पोलीसांनी त्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा..




