

*नाशकातील टेंडर घोटाळा बाहेर काढणारे प्रशांत मोटे ठाण्यात निवडणुकीच्या रिंगणात*
*ठाणे* : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी उपक्रमातील सुमारे ६० कोटी रुपयांचा घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे प्रशांत मोटे ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहरात विविध कामे सुरु आहेत.त्यांतील विविध ६० कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या.या निविदा प्रक्रियेत चार कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यात सेक्युटेक ऑटोमेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. मात्र या निविदेप्रक्रियेत सहभागी होताना सदर कंपनीने पूर्तता केलेल्या कागदपत्रांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप प्रशांत मोटे यांनी केला. या निवडीसाठी कंपनीची वार्षिक उलाढाल ३५ कोटी रुपयांची असणे बंधनकारक होते. मात्र निविदा मंजूर करण्यात आलेल्या कंपनीची उलाढाल तेवढी नसल्याचे प्रशांत मोटे यांनी सांगितले.याशिवाय सनदी लेखापालाचे प्रमाणपत्र देण्याची अट होती. त्यानुसार सदर प्रमाणपत्र दिलेल्या सनदी लेखापाल रामदास उगले यांचे दहा वर्षापूर्वी १८ एप्रिल २०१५ रोजी निधन झाले असल्याचे मोटे यांनी उघडकीस आणले. निविदेप्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यांची तक्रार तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रीय स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कुमार याच्याकडे तक्रार करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मोटे यांनी कुठल्याही आमिषाला बळी नपडता केली होती.
आता नुकत्याच जाहीर झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रशांत मोटें सारख्या स्वच्छ चारित्र्य असणार्या तरुणाला ठाण्यातील जनता विशेष करून प्रभाग क्रमांक 3 मधील मतदार नक्कीच साथ देतील यात काही शंकाच नाही.




