
0
0
2
8
3
3

दिवा, दि.२८ :- गणेश नगर, दिवा पूर्व खाडी पट्ट्यात अवैध गावठी हातभट्टी गाळप केंद्र सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून दिवा पोलीस चौकी येथील सपोनि वसंत खतेले, सपोनि अमोल कोळेकर, सपोनि राजेंद्र तोरडमल, पोउपनि सुभाष मोरे, पोलीस अंमलदार गोविंद मुंढे, जयेश तामोरे, महेश जाधव, वसीम तडवी, निळकंठ लोंढे यांचेसह गणेशनगर-आगासन दिवा पूर्व यादरम्यानचे खाडी परिसरात पंचांसह जाऊन पाहणी केली असता, गणेश नगर खाडीपट्ट्यातील दलदलीमध्ये गावठी हातभट्टी गाळप कारखाना व 200 ड्रम दारू बनविण्याचे रसायन (3600 लिटर) मिळून आले. याबाबत इ साक्ष एप्लीकेशन मध्ये व्हिडिओ ग्राफी करून व सविस्तर पंचनामा करून गावठी हातभट्टी गाळप कारखाना, दोनशे ड्रम आणि त्यामधील दारू निर्मितीचे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे.
पहा सविस्तर व्हिडिओ सह..
0
0
2
8
3
3




