Breaking
ई-पेपरठाणेब्रेकिंग

Thane : ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस ७२ तासाचे आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने गुजरात येथुन केले जेरबंद

0 0 2 8 3 3

 

ठाणे.दि.२४ :- नौपाडा पोलीस ठाणे हद्द्दित दिनांक १७/१२/२०२४ रोजी ०१:५० वा. ते ०४:३० वा. दरम्यान मे. वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा.ली नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इसमांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दाराचे कडी कोयंडा तोडुन तसेच शटर उचकटु, वाकवुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश २८,७७,४९०/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणुन करून नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ११८२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३३१(२), ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यांचे सुचनेप्रमाणे मा. सहा. पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री. शेखर बागडे यांनी विशेष पथके तयार केली होती. खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने सदर गुन्हयातील आरोपींतांबाबत कोणतेही धागेदोरे व सुगावा नसताना सी.सी.टि.व्हि फुटेज, तांत्रिक विष्लेषणाव्दारे तसेच गुप्तबातमीदारामार्फत अतिशय कौशल्यपुर्व आरोपीतांचा तपास करून आरोपी १) लिलाराम उर्फ लिलेश मालाराम मेघवाल वय २९ वर्षे, काम आइस्क्रिम पार्लर, रा. छत्रपाल हनुमान मंदीराचे पाठीमागे, टपाल मंडपच्या समोर, गोपी तलाव रोड, नाडीयावाड, संग्रामपुरा, सुरत, मुळ रा. मु. पहारपुरा, पो. राणीवाडा, ता. भिनमाल, जि. जालोर, राजस्थान, २) चुन्नीलाल उर्फ सुमत शंकरलाल प्रजापती, वय ३५ वर्षे, काम मिस्वीकाम, रा. छत्रपाल हनुमान मंदीराचे पाठीमागे, टपाल मंडपच्या समोर, गोपी तलाव रोड, नाडीयावाड, संग्रामपुरा, सुरत, मुळ रा. मु.धणारी, पो. स्वरूपगंज, ता. पिंडवाडा, जि.सिरोई, राजस्थान, ३) जैसाराम उर्फ जेडी देवाराम कलबी, वय ३२ वर्षे, काम प्लंबर/इलेक्ट्रीशन, रा. गणेश टॉवर, वाशीनाका, चेंबुर, मुंबई, मुळ रा. जुंजाणी जालौर, राजस्थान, ४) दोनाराम उर्फ दिलीप मालाराम पराडिया, वय २४ वर्षे, काम डायमंड मार्केट, रा. वराछा रोड, खोडीयारनगर सोसायटी चाळ, सुरत, गुजरात, मुळ रा. पहाडपुरा, पो.पावली, ता.जिसमपुरा, जि. जालौर, राजस्थान व ५) नागजीराम प्रतापजी मेघवाल वय २९ वर्षे, काम दुकानदार, रा. छत्रपाल हनुमान मंदीराचे पाठीमागे, टपाल मंडपच्या समोर, गोपी तलाव रोड, नाडीयावाड, संग्रामपुरा, सुरत, मुळ रा. मु. पहारपुरा, पो. राणीवाडा, ता. भिनमाल, जि. जालोर, राजस्थान यांना सुरत गुजरात राज्य येथुन ताब्यात घेतले. त्यांचेकडुन चोरी केलेल्या मालापैकी ४८३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साडे पाच किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी व दागिने व इमिटेशन ज्वेलरी, मोबाईल फोन व इतर वस्तु असा एकुण २९,१५,३४०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांना दि. २१/१२/२०२४ रोजी अटक केली असुन त्यांची दिनांक २६/१२/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. सदर गुन्हयाचा तपास. चालु आहे.

आरोपीतांचा पुर्व इतिहास पाहता, त्यांचेवर १) कपोदय पो.स्टे सुरत, गुजरात गु.र.नं. ११४/२०१८ भादवि. कलम ४५४, ३८० प्रमाणे व २) जसवंतपुरा पो.स्टे. राजस्थान येथे गु.र.नं. ५६/२०१९, भादवि. कलम ४५४, ३८० प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमरसिंह जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त शोध २ (गुन्हे) श्री. राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली मा. सहा. पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक श्री. शेखर बागडे, पोनि/नरेंद्र पवार, पोनि/संजय शिंदे, सपोनिरी/सुनिल तारमळे, सपोनिरी/श्रीकृष्ण गोरे, सपोनिरी/भुषण कापडणीस, पोउपनिरी/विजयकुमार राठोड, पोउनिरी/सुभाष तावडे, पोउपनिरी/दिपक पाटील, सपोउनि/संजय बाबर, सपोउनि/संदिप भोसले, पोहवा/दिपक गडगे, पोहवा/राजाराम पाटील, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/दादासाहेब पाटील, पोहवा/संजय राठोड, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/अभिजीत गायकवाड, मपोहवा/शितल पावसकर, पोना/रविंद्र हासे, पोना/सुमित मधाळे, पोशि/तानाजी पाटील, पोशि/संतोष वायकर, पोशि/अरविंद शेजवळ, पोशि/विनोद ढाकणे, पोशि/योगेश शिरसागर, पोशि/रोहन म्हात्रे, पोशि/दत्तात्रय घोडके, पोशि/मयुर शिरसाठ, चापोना/भगवान हिवरे यांनी केलेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे