Breaking
ई-पेपरठाणेब्रेकिंगसंपादकीय

कासारवडवली पोलिस ठाणे पथकाची उल्लेखनीय कामगिरी.

0 0 3 1 0 1

 

मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस सह आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. विनायक देशमुख, अपर पोलिस आयुक्त, ठाणे शहर श्री. प्रशांत कदम, पोलिस उप आयुक्त परि ५ ठाणे शहर व श्री मंदार जावळे, सहाय्यक पोलिस आयुक्त , वर्तकनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलिस ठाणे चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, निहली कोन्हटकर यांनी नागरिकांचे चोरी / गहाळ झालेले मोबाईल फोनचा शोध घेऊन ते नागरिकांना परत मिळवून देण्याकरिता पोलिस उप निरीक्षक सौरभ थोरवे, पोशी / २६४७ कृष्कांता भगत यांचे एक विशेष पथक तयार केले CEIR ( central equipment Identity register ) या पोर्टलद्वारे गहाळ झालेले मोबाईल ट्रेस करून गहाळ झालेले मोबाईल हे ठाणे शहर आयुक्तालयसह महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे तसेच पूर्ण देशभरामधून ट्रेस झालेले मोबाईल जे व्यक्ती वापरात आहेत किंवा ज्यांच्या ताब्यात आहेत.त्यांच्याशी संपर्क करून मोबाईल परत करण्यास सांगितले असता महाराष्ट्रासह इतर राज्यातून काही मोबाईल परत मागविले. अनेक मोबाईल प्रत्यक्ष त्या ठिकाणावरून हस्तगत करण्यात आले मागील कासारवडवली पोलिस ठाणेकडून सुमारे १८ लाख ७० हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ७३ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून यापुढे अशीच मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ / चोरी झालेले मोबाईल परत करण्याची कार्यवाही चालू आहे सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कासारवडवली पोलिस ठाणे कडील वरिष्ठ निरीक्षक श्री. निहल्ली कोल्हटकर, पोलिस उप निरीक्षक सौरभ थोरवे, पोशि / २६४७ कृष्कांत भगत यांनी केली आहे.

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 1 0 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे