Breaking
ठाणेब्रेकिंग

कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिन इसमांना अटक

0 0 2 8 3 3

ठाणे : अंमली पदार्थाचे बेकायदेशिर खरेदी विकी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांचे आदेश झाले होते. त्याअनुषंगाने दिनांक 07/01/2025 रोजी मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा ठाणे शहर घटकातील सपोनि / अविनाश महाजन यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने नविन आरटीओ जवळ सर्विस रोड ठाणे पश्चिम याठिकाणी सापळा रचुन आरोपी 1) अझर उर्फ आलम आबीद शेख, वय 27 वर्षे, राह. मोमीनपुरा हुसेनी बाग महफीलवाली चाळ मुंबई यास कोकेन या अंमलीपदार्थासह ताब्या घेवून त्याने दिलेल्या माहितीवरून आरोपी 2) उस्मान उर्फ सोनू अब्दुल कादीर शेख वय 37 वर्षे, रा. क्लेअर रोड, भायखळा मुंबई यास भाखखळा मुंबई येथुन अटक करून त्याचे कडून प्राप्त माहितीवरून आरोपी 3) ओन्यादीकांची वॉन्को प्राचिओस वय 24 वर्षे, (ONYEDIKACHI PRECIOUS IKECHUKWU) राह. जुहू गाव, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई या नायजेरीयन इसमास वाशी येथून अटक करून आरोपी यांचेकडून व्यापारी मात्रेतील एकुण 101.16 गॅम वजनाचा व 10,12,000/-रु. किमतीचा कोकेन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर बाबत वागळे इस्टेट पोलीस स्टेशन गु.रजि.नं 23/2025 एनडीपीएस कायदा कलम 8 (क), 21 (ब), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेले कोकेन हा अंमली पदार्थ त्यांनी कोठुन व कोणाकडुन आणले आहे. याबाबत अधिक तपास करीत आहोत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे साो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंजाबराव उगले मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमरसिंह जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर कक्षाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, सपोनि/अविनाश महाजन, सपोउपनि / शिवाजी गायकवाड, सपोउनि/नगराज रोकडे, पोहवा/4487 दिनेश कुंभारे, पोहवा /6567 प्रशांत भुर्के, पोहवा/2958 जयकर जाधव, पोहवा / 1453 सुनिल गिरे, पोहवा/4475 जितेंद्र वाघमोडे, मपोहवा/3192 आशा गोळे,, पोअं/4094 अशोक पाटील, पोअं/8301 महेश सावंत व चापोअं/1029 सदन मुळे यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / अविनाश महाजन हे करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे