Breaking
ठाणेब्रेकिंग

Thane : घटक २, भिवंडी, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारास मोटार सायकल व मोबाईल फोन सह ताब्यात घेवुन एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले

0 0 2 8 3 3

ठाणे, दिनांक १७ : गुन्हे शाखा, घटक- २, भिवंडी येथे गुप्त बातमीदार मिळालेल्या माहितीनुसार शांतीनगर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार हा रामनगर, डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटरसायकल व मोवाईल विक्री करता आला असता गुन्हे शाखा-२ भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून केलेल्या कारवाई दरम्यान शांतीनगर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार शेरआली उर्फ पिल्या इमाम फकीर वय २२ वर्ष राहणार-स्वतः चे घर, घर नं ५८६, गणेश लॉन्ड्री च्या गल्लीत, गायत्रीनगर पोलीस चौकी समोर, भिवंडी यास दोन पंचा समक्ष ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या शर्टचे खिशात एक मोबाईल व त्याचे जवळ नंबर प्लेट नसलेली वर्गमन मोटरसायकल मिळून आली. तसेच वर्गमनची डिक्की चेक केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे १० मोबाईल मिळून आले. सदर मोटरसायकल व मोबाईल बावत त्याचेकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने मिळालेल्या वस्तूचा पंचासमक्ष पंचनामा करून त्यास युनिट कार्यालयात आणून त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मोटरसायकल व मोबाईल हे वेगवेगळया ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून विविध पोलीस ठाणे मधील मोबाईल चोरीचे ११ गुन्हे व मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आणून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले एकूण ११ मोबाईल फोन व १ मोटर सायकल स्कूटर असा एकूण २,४५,१९९/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी विरोधात यापुर्वी विविध पोलीस ठाण्यात एकूण १४ गुन्हे दाखल आहेत.

उघडकीस आणलेले गुन्हे :-

१) शांतीनगर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १८१४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४),३(५).

२) खडकपाडा पोलीस ठाणे, गु.र.क्र. ८६७/२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२).

३) भिवंडी शहर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १२३५/२४ भा.न्या. सं ३०३(२).

४) भिवंडी शहर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १२४८/२४ भा.न्या. सं ३०३(२).

५) भिवंडी शहर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १२३६/२४ भा.न्या. सं ३०३(२).

६) भिवंडी शहर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १२४६/२४ भा.न्या. सं ३०३(२).

७) भिवंडी शहर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १२४३/२४ भा.न्या. सं ३०३(२).

८) भिवंडी शहर पोलीस ठाणे, गु.र.क्र. १२४८/२४ भा.न्या. सं ३०३(२).

९) भोईवाडा पोलीस ठाणे, गु.र.क्र. ८००/२४ भा.न्या.सं ३०३(२).

१०) भोईवाडा पोलीस ठाणे, गु.र.क्र. ८०४/२४ भा.न्या. सं ३०३(२).

११) निजामपूर पोलीस ठाणे, गु.र.क्र. ९०४/२४ भा.न्या. सं ३०३(२).

१२) निजामपूर पोलीस ठाणे, गु.र.क्र. ९०५/२४, भा.न्या. सं ३०३(२).

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त श्री. अमरसिंह जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त शोध १ (गुन्हे) श्री. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटक २. भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनी/धनराज केदार, सपोउनि/सुधाकर चौधरी, पो.हवा/प्रकाश पाटील, पोहवा/सचिन जाधव, पोशि/अमोल इंगळे, पो.शि/भावेश खरात, पोशि/विजय कुंभार, पोशि/नितीन बैसाणे यांनी केली आहे.

तसेच सीईआयआर (सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर) पोर्टलवरून गुन्हे शाखेच्या खालील नमुद घटकांनी नमुद प्रमाणे वेगवेगळया कंपनीचे एकूण ७६ मोबाईल हस्तगत केले असून सदर मोबाईल मुळ मालकांचे ताब्यात देण्यात येत आहेत घटक १, ठाणे १५ मोबाईल, घटक २, भिवंडी १५ मोबाईल, घटक ३, कल्याण ०५ मोबाईल, घटक ४,उल्हासनगर २१ मोबाईल, खंडणी विरोध पथक २० मोबाईल.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे