Breaking
गुन्हेगारीठाणेब्रेकिंगसंपादकीय

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पत्रकार प्रशांत मोटे यांच्यावर एमडी (अमली पदार्थ ) ड्रगविक्रेता शब्बीर याच्याकडून भररस्त्यात धारदार शस्त्राचा जीवघेणा हल्ला.

0 0 2 8 3 3

ठाणे.दि.६ ( रुपाली कदम ):- मुख्यमंत्र्याच्या ठाणे शहरात गुंडप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात दिवसाढवळ्या हत्या होण्याच्या घटना घडत आहेत. नुकतंच ठाण्यात पत्रकारावर झालेल्या हल्ल्यामुळे गुंडांना कोणाचीही भिती नसल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीच प्रमाण वाढत चाललं आहे. त्यात पुणे, मुंबई आणि आता ठाणे शहरांचा समावेश आहे. अलीकडे ठाण्यात देखील ड्रग्ज माफियांचं वाढत सत्र पाहायला मिळत आहे. नुकतच ठाण्यामध्ये एमडी ड्रग माफियाकडून पत्रकारावर हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना खूपच दुर्दैवी असून यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. परंतु घडलेल्या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.ठाण्यात गोकुळनगर येथे एका पत्रकारावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. यामुळे ठाणे शहारात चिंतेचे वातावरण आहे. न्यूज ९ महाराष्ट्रचे पत्रकार यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला आहे. प्रशांत मोटे, वय वर्ष ३४ हे माजिवडा येथे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवर मी शब्बीर बोलतोय, असे सांगून तुम्ही पत्रकार क्षेत्रात चांगले काम करता मला तुम्हाला भेटायचं आहे, असं फोनवर बोलून प्रशांत मोटे यांना गोकुळनगर येथे त्या व्यक्तीने बोलावून घेतले. दोघांची भेट झाली. नंतर शब्बीरने मोटेंना माझ्यासोबत चला, आपण बोलूया असे सांगून गोकुळनगर येथील पाण्याची टाकी येथे घेवून गेला. यानंतर त्यांना धारदार शास्त्राचा धाक दाखवून गळ्यातील चैन आणि रोख पैसे लुटले. पुढे या गुडांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात पत्रकार प्रशांत मोटे रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले. सदर घटना पहाटे घडली असता या गुडांनी तेथून पळ काढला. सदर प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचं सांगितलं जातं आहे. प्रशांत मोटे यांच्यावर घोडबंदर टायटेन हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.आरोपी शब्बीर हा एक अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्स ब्रॅकेट मध्ये एमडी हा विक्रेता आहे. व तो जुना गुन्हेगार असून त्याला दोन वेळा ठाण्यातून तडीपार केलेले आहे. व त्याच्यावरती हत्या ड्रग डीलिंग चोरी अपहरण असे अनेक गुन्हे असल्याची सुत्रांची माहिती आहे.

5/5 - (3 votes)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे