Breaking
ई-पेपरठाणेब्रेकिंगराजकियसंपादकीय

निष्ठावंतांचे ठाणे – मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन

0 0 2 8 3 3

*निष्ठावंतांचे ठाणे – मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन*
# शरद पवारांच्या हस्ते मनोज प्रधान यांना नियुक्तीपत्र

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 125 गाड्यांमधून शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई गाठून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या प्रसंगी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्षपदी मनोज प्रधान यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मनोज प्रधान यांच्या नियुक्तीनंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळेच नियुक्तीपत्र स्वीकारण्यासाठी ढोलताशांच्या गजरात ठाणे शहरातून सुमारे 125 गाड्यांमधून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले. तत्पूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि शरद पवार, डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या जयघोषात मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजीत पवार आणि युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांना नियुक्तीपत्रासह भावी कार्यकाळासाठी शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
मनोज प्रधान यांच्या नियुक्तीने पक्षसंघटनेला बळच मिळणार आहे, असे विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

 

5/5 - (1 vote)

लोक सम्राट

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे