ठाणे : “एम.डी (ड्रग्ञ्ज) या अंमली पदार्थाच्या उत्तराखंड येथील फॅक्टरीवर धाड टाकुन नेपाळ येथे पळुन जाणाऱ्या ३ आरोपींना गुन्हे शाखेकडुन अटक “


ठाणे.दि.२ ( उप संपादक – रितिक निकाळे) :- कासारवडवली पो.स्टे.गु.२.नं. ५४४/२०२५ एन.डी.पी.एस. कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे दि.०१/०६/२०२५ रोजी दाखल गुन्हयावा तपास गुन्हे शाखा, पटक ५, वागळे, ठाणे कहुन करण्यात येत असुन सदर गुन्हयातील १) विशाल विपीन सिंह, ३२) मल्लेश रमेश शेवला या अटक आरोपीकडुन १०.९३ ॉग (३५,०००/- रु किंमीये) एम.डी हे ड्रग्ज, हस्तगत करण्यात आले होते. त्यांनी उत्तराखंड येथील एका व्यक्तीकडुन सदरचे हुग्ज, विकत आणले असल्याचे सांगितले, त्याबाबत अधिक तपास करून माहिती प्राप्त करून तसेच पो.ना/७१५९ ठाणेकर यांनी तांत्रिक तपास करून सदरचे हुम्ज हे उत्तराखंड येथे तयार करण्यात येत असल्याचे निष्पन्न केले. भा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व.पो. निरी/सलील भोसले यांनी दोन पथके तयार केली, पथक क्र. १ मधील स.पो.निरी भुषण शिंदे, स.पो. निरी शरद पाटील, पो. हवा / ३९६७ ज्ञानेश्वर जाधव, व पोशि/८०३३ मिनीनाथ शिकारे यांनी उत्तराखंड येथे जावुन सापळा रचुन पाळत ठेवली असता मेललोडा, ता. देवलथ, पिथोरगढ, उत्तराखंड येथे एम.डी या ड्रग्ज.ची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्याने तिथे दि. २७/०६/२०२५ रोजी धाड टाकुन एम.डी या ड्रग्ज बी निर्मीती करण्याकरीता लागणाऱ्या मशिन व विविध रसायने असा कच्चा मालाचा एकुण १८,५४,५०७/- रू किंमतीचा साठा मिळून आल्याने तो ताब्यात घेवुन जप्त केला.
त्याचवेळी सदर ठिकाणी एम.डी ड्रग्ज तयार करणारे ३ आरोपी हे टनकपुर, जि. चंपावत, उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाल्याने, त्यांचा शोध, घेणे करीता पथक क्र. २ चे पो.उप.निरी/तुषार माने, पो. हवा/४५२९ सुनिल निकम, पो.ना/४१२१ सचिन बंडगर व पो.ना/७१५९ ठाणेकर यांनी आरोपींना नेपाळ देशात पळुन जात असताना त्यांचा शिताफीने पाठलाग करून आरोपीना नेपाळ बॉर्डर जवळ उत्तर प्रदेश येथील खीरी जिल्हयातील पलिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक पोलीसांच्या मदतीने सियाज या चारचाकी वाहनासह तांब्यात घेण्यात आले, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी क.१) ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनू, रा. टनकपुर, उत्तराखंड. २) भिम सुरेंद्र यादव, रा. नालासोपारा. ३) अमरकुमार लक्ष्मणराम कोहली, रा. टनकपुर, उत्तराखंड या ३ आरोपींना दि.२८/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच यातील आरोपी नामे १) ओम जयगोविंद गुप्ता उर्फ मोनु, व २) अमरकुमार लक्ष्मणराम कोहली, हे उत्तर प्रदेश मध्ये एम. ही अंमली पदार्थ बनविणाऱ्या फॅक्टरी संदर्भात कासारवडवली पो. स्टे गु.२.नं.१८६/२०२४ एन.डी.पी.एसु कलम ८ (क), २२ (ब), २२ (क), २९ प्रमाणे दाखल गुन्हयात पाहिजे आरोपी आहेत.
नमुद छापा कारवाईत एम.डी हे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे मशिन, रसायने तसेच आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन असा एकुण ३०,९९,५०७/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक आरोपी यांना दि.०५/०७/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. स.पो.निरी/ भुषण शिंदे, गुन्हे शाखा हे पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री. अमरसिंह जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त शोध १ गुन्हे श्री. शेखर बागडे, गुन्हे शाखा घटक ५ वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहा. पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, सहा. पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोउपनिरी तुषार माने, स.पो.उप. निरी/चौधरी, पो. हवा/४५२९ निकम, पोल्या/३६३३ शिंदे, पोहवा/४३१५ कार्ले, पोहया / ३५९३ रावते, पोहबा /२२२८ पालांडे, पोहवा / ३५५५ काटकर, पो. हवा/२६९९ पाटील, पो. हया/३९६७ जाधव, मपोहवा /६६९७ गिते, मपोहवा/७४६७ महाले, पो.मा/७२८ गार्डे, पोना/४१२१ बंडगर, पोना/७१५९ दाणेकर, पो.शि/२८५० शेडगे, पोशि/८०३३ शिकारे, पोशि/७५४ यादव, या पथकाने केली आहे.




